“मी ऋणी तुमचा…..”

मी रितेश हनमंत नलावडे . डॉन बॉस्को शाळेचा क्रिकेट मध्ये आवडीने सहभागी होऊन कौशल्य दाखवणारा विद्यार्थी.
मी ‘क्रिकेट ‘ या शब्दा बरोबरच ‘अभ्यास’ या शब्दालाही महत्व दिले. दोन्हीचा समतोल साधत मी यशाचे शिखर गाठू शकलो .
प्रामाणिक पणे केलेली मेहनत , गुरुजनांचे व पालकांचे मार्गदर्शन, वेळेचा सदुपयोग सर्व विषयाचा समान सराव यामुळे मी आज ९४.२०% इतक्या गुणाचे शिखर गाठू शकलो .
शाळेत जे शिकवले त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून, मी माझा अभ्यास व क्रिकेटची प्रॅक्टिस करत होतो. मी कोणताही क्लास लावला नव्हता.
व्यवस्थित वेळापत्रक बनवून, ज्या त्यावेळी तो अभ्यास कसा पूर्ण होईल , यावर लक्ष केंद्रीत केले.
सुरूवातीला नवीन पुस्तके ,नवीन अभ्यासक्रम नवीन, परीक्षा पद्धत याचे थोडे दडपण होते. पण ते पेपर लेखनाच्या सरावामुळे कमी झाले.
डिसेंबर मध्ये माझ्या MSSA च्या २-२ दिवसाच्या क्रिकेटच्या मॅचेस चालू असल्यामुळे त्या काळात माझे अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते . पण मॅचेस संपल्यानंतर जानेवारी,फेब्रुवारी,मार्च या तीन महिन्यांत मी माझा पूर्ण वेळ अभ्यासासाठी दिला.
माझ्या वर्ग शिक्षकासोबतच इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य, व मोलाचे मार्गदर्शन , मदतीचे हात मला लाभले.
त्याबद्दल शाळा व शाळेतील शिक्षक या सर्वांचा मी शतश: ऋणी आहे व आयुष्यभर राहिल.
आम्ही सारेच विद्यार्थी पृथ्वीच्या कोणत्याही भागात असू पण आमच्या शाळेचे नाव गर्वाने घेऊ.अभिमानाने छाती फुगवून सांगू की आम्ही डॉन बॉस्को या शाळेचे विद्यार्थी आहोत.
या शाळेने खेळ व अभ्यासा बरोबर
सांस्कृतिक कार्यक्रम ,नैतिक मूल्ये
याची अमूल्य शिदोरी आम्हा सर्वांना दिली आहे. ही शिदोरी आमच्या आयुष्यच्या पुढच्या प्रवासात आम्हाला नक्कीच उपयोगी पडेल .
पुन्हा एकदा माझ्या यशासाठी तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

रितेश नलावडे .
10 वी ‘क’ .
( 2018_19 बॅच).

Powered by Intellischools